सिंहगड विजय दिन
   
सिंहगड विजय दिन - नरवीर नावजी बलकवडे पुरस्कार - छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाने जिंकून घेतलेला सिंहगड तानाजी मालुसरेंसारखा पराक्रम गाजवून आषाढ शुद्ध अष्टमी दि. १ जुलै १६९३ या दिवशी सरदार नावजी बलकवडे यांनी पुन्हा जिंकून घेतला. या दिनाच्या निमित्ताने सकाळी किल्ले सिंहगडावर आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंगजी बलकवडे, मोडी लिपीचे अभ्यासक श्री. राजेंद्रजी ढुमे आणि मंडळाचे कार्यवाह श्री. सुधीर थोरात यांनी या विजय दिनाची माहिती दिली. त्याच दिवशी सायंकाळी वीर बाजी पासलकर स्मारकात झालेल्या कार्यक्रमात कमाडोर अजय चिटणीस (निवृत्त, SC NM) यांना लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त, PVSM, UYSM, VSM) यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रजनी इंदुलकर तसेच मंडळाचे कार्यवाह श्री. सुधीर थोरात उपस्थित होते.