गडारोहण स्पर्धा - मागील २५ वर्षे मंडळातर्फे रायगड गडारोहण स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी एकूण ६ वयोगटातील सुमारे २५० स्त्री आणि पुरुष स्पर्धाकांनी भाग घेतला होता. प्रत्येक गटातील प्रथम ५ स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकांच्या विजेत्यांना शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.