'छत्रपती शिवाजीमहाराज' ग्रंथ प्रकाशन
       
     'छत्रपती शिवाजीमहाराज' ग्रंथ प्रकाशन - शिवचरित्राच्या प्रसारासाठी मंडळ अनेक उपक्रम करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाने शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके लिखित 'छत्रपती शिवाजीमहाराज' या ग्रंथाचे प्रकाशन वीर बाजी पासलकर स्मारकात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे यांचे हस्ते रविवार दि. ९ सप्टेंबर २०१८ रोजी केले. याप्रसंगी मा. दादा रावत आणि डॉ. केदार फाळके यांची शिवचरित्राची आजच्या काळातील आवश्यकता सांगणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे कार्यवाह श्री. सुधीर थोरात यांनी केले.